मंत्रालय प्रवेशासाठी नवे नियम कडक — माजी खासदार-आमदारांनाही चेहरापडताळणी बंधनकारक!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🔴 मंत्रालय प्रवेशासाठी नवे नियम कडक — माजी खासदार-आमदारांनाही चेहरापडताळणी बंधनकारक!

मुंबई : मंत्रालयात प्रवेशासाठीचे नियम अधिक काटेकोर करण्यात आले असून, आता माजी खासदार आणि माजी आमदारांनाही प्रवेशासाठी चेहरा पडताळणी (Face Verification) बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, मंत्रालयात ऊठसूट सर्व वाहनांना प्रवेश देणे बंद होणार असून, फक्त काही वरिष्ठ पदावरील व्यक्तींनाच वाहन प्रवेश मिळणार आहे.

१५ ऑगस्टपासून मंत्रालयीन प्रवेशासाठी डिजी प्रवेश प्रणाली (Digital Entry System) कार्यान्वित होणार आहे. याअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांसह माजी आमदार, माजी खासदार आणि विधिमंडळातील कर्मचाऱ्यांनाही RFID-आधारित चेहरा पडताळणी करावी लागणार आहे. त्यांच्या ओळखपत्रावर प्रवेश मिळणार असला तरी पडताळणी अनिवार्य राहील.

🚫 वाहन प्रवेशावर बंधने
आमदार-खासदारांची वाहने मंत्रालयाबाहेर पार्क करावी लागतील. आमदार-खासदारांसोबत येणाऱ्या व्यक्तींनाही थेट प्रवेश मिळणार नाही. वॉकी-टॉकी संदेशावरून कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही; वाहनावर वैध प्रवेश पास असलाच तरच प्रवेश मिळेल.

📌 स्मार्टफोन नसणाऱ्यांसाठी सोय
डिजी ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्यांनाच प्रवेश देण्याचा नियम काहीसा शिथिल करण्यात आला आहे. स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांसाठी मंत्रालयात एक खिडकी ठेवली जाईल, जिथे चेहरा पडताळणी करून प्रवेश कार्ड दिले जाईल.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सकाळी १२ वाजता प्रवेश दिला जाईल, तर दुपारी २ नंतर त्यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र रांग असेल.


#मंत्रालय #चेहरापडताळणी #डिजीप्रवेश #मुंबईबातमी #राज्यशासन #RFID #FaceVerification

📸 फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...