जैतापुरचा राजा सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ जैतापुर तर्फे
सौर ऊर्जा प्रात्यक्षिक, मार्गदर्शन कार्यक्रम संपन
राजापूर – (दिनेश कुवेस्कर) – जैतापूरचां राजा सार्वजनिक गणेशोत्सव तर्फे सोलर ऊर्जा प्रात्यक्षिक, मार्गदर्शन कार्यक्रम दि. 2/9/2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता दळे, सड़ेवाड़ी येथील अनिल करंजे यांच्या घरी संपन्न झाला. अनिल करंजे यांनी 5 किलोव्याट चे सोलर प्यानल बसविले असून त्यांना पांच ते साडे पांच लाख खर्च आला असून त्यांना महीना तब्बल 22ते 25 हजार रुपये लाइट बिल येत होते मात्र ते त्यांचे पैसे वाचले असून जे त्यांनी 25वर्ष काहीही मेंटेनन्स नस्लेले सोलर पॅनल बसवले आहे, त्यांना आता पांच वर्षाने बॅटरी शिवाय मेंटेनन्स काहीही नसल्याचे ते म्हणाले.शासन आता सोलर ऊर्जे चे प्यानल बसविण्यासाठी आता अनुदान देत असून सूर्यघर योजने सारख्या योजना आता शासनाचे सुरु केल्या असून ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी याबाबत मार्गदर्शन करताना या सोलर बाबत दोन प्रकार असल्याचे सांगितले एक ऑन ग्रीड व दुसरी ऑफ ग्रीड ऑन ग्रीड साठी शासन किलो व्हॅट प्रमाणे अनुदान देते आपल्याला घरगुती वापरासाठी किमान 1 ते 3 किलो व्हॅट पर्यंत सोलर सिस्टीम ची आवश्यकता असते या मुळे आपले इलेक्ट्रिक बिल पूर्णपणे कमी होते व शासनाचा देखील विजेचा भार आपण काही प्रमाणात कमी करू शकतो
यावेळी मंडळचे सल्लागार गिरीश करगुटकर, अध्यक्ष राकेश दांडेकर, सचिव सुनील करगुटकर, माजी अध्यक्ष संदीप चव्हाण, जेष्ठ सदस्य श्रीकृष्ण राऊत, माजी उपसरपंच प्रसाद करगुटकर, माजी मुख्याध्यापक नार्वेकर गुरूजी, नार्वेकर मैडम, फोटोग्राफर आणि सदस्य निलेश पालकर, गजानन करमळकर आणि यावेळी उपस्थित होते.