नागेश्वर एकता मंडळ दोडवली कांबळेवाडी तर्फे गणेशोत्सव २०२५ साठी नव्या टी-शर्टचे अनावरण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

✨🎉 नागेश्वर एकता मंडळ दोडवली कांबळेवाडी तर्फे गणेशोत्सव २०२५ साठी नव्या टी-शर्टचे अनावरण

मुंबई मालाड येथे जेष्ठ कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न

गुहागर – दोडवली 

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी देशभक्तीच्या पार्श्वभूमीवर नागेश्वर एकता मंडळ, कांबळेवाडी-दोडवली तर्फे गणेशोत्सव २०२५ निमित्ताने नव्या टी-शर्टचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. वाडीतील सर्व सभासद व नागेश्वर एकता नृत्यकथा पथकासाठी छापण्यात आलेल्या या टी-शर्टचे अनावरण मुंबईतील मालाड येथे वाडीतील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक कांबळे, सेक्रेटरी संतोष कांबळे, खजिनदार प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष विठ्ठल पंडये, कार्याध्यक्ष नारायण कांबळे यांच्यासह मंडळातील सन्माननीय पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मंडळातील सदस्य कु. सूरज पांडुरंग कांबळे यांना “तुरेवाले शाहीर” म्हणून गौरविण्यात आले. मंडळाच्यावतीने त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शेवटी उपस्थित ग्रामस्थ, सभासद आणि युवकांचे आभार मानून येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 🙏

 

 

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#गणेशोत्सव२०२५ #नागेश्वरएकतमंडळ #दोडवलीकांबळेवाडी #टीशर्टअनावरण #गणपतीबाप्पामोरया

 

 

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...