📰 गणेशभक्तांना दिलासा : रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
मुंबई :
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा रेल्वेने तब्बल ३६७ जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून यामुळे मुंबईसह राज्यभरातून कोकणात प्रवास करणाऱ्या भक्तांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे ही माहिती दिली. राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या भावविश्वाशी जोडलेला मानबिंदू आहे. मुंबईत वसलेले कोकणवासी तसेच इतर भागातील नागरिक गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मूळ गावी जातात. जादा फेऱ्यांमुळे प्रवाशांना सोईस्कर आणि सुरक्षित प्रवास करता येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
🔖 हॅशटॅग्स :
#गणेशोत्सव२०२५ #कोकणरेल्वे #जादारेल्वे #देवेंद्रफडणवीस #गणेशभक्त
📸