नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये; पहिले टेकऑफ डिसेंबरमध्ये!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

✈️ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये; पहिले टेकऑफ डिसेंबरमध्ये!

94 टक्के काम पूर्ण, मोदींच्याच हस्ते होणार लोकार्पण

नवी मुंबई : बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार असून पहिले टेकऑफ डिसेंबर महिन्यात होईल. विमानतळाचे 94 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये कामाची पाहणी करून सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 30 सप्टेंबरला उद्घाटनाचा मानस होता. मात्र आता उद्घाटनाचा मुहूर्त ऑक्टोबरमध्ये ठरवला गेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच हे लोकार्पण होणार आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, उद्घाटनानंतर विमानतळाची जबाबदारी सीआयएसएफकडे सोपवली जाईल आणि दोन महिन्यांच्या प्रक्रियेनंतर डिसेंबरमध्ये पहिले विमान झेप घेईल. इंडिगो एअरलाईन्स हे पहिले उड्डाण करणार असून नोव्हेंबर 2025 च्या सुरुवातीला येथे दररोज 79 उड्डाणे होतील, त्यापैकी 14 आंतरराष्ट्रीय असतील.

या विमानतळावरून दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि सुमारे 3.2 टन मालवाहतूक होईल. एकूण 2,866 एकर जमिनीवर हे भव्य प्रकल्प उभारला गेला आहे. विमानतळाची मुख्य इमारत कमळाच्या फुलाच्या आकारात असणार असून धावपट्टी, टॉवर, अटल सेतूशी जोडणारे रस्ते यांसारखी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

सध्या अदानी समूहाकडे देशातील मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम असे विमानतळ आहेत. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही अदानी समूहाच्या हाती येणार आहे.

 

✅ हॅशटॅग्स :

 

#नवीमुंबईविमानतळ #MumbaiAirport #NaviMumbai #Indigo #AdaniGroup #रत्नागिरीवार्ताहर

 

📷 फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...