💥रत्नागिरीत बँक फसवणुकीचा मोठा पर्दाफाश!
बनावट कागदपत्रांच्या आधारे ५० लाखांचे सोने गायब
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ला शाखेत तब्बल ५०४.३४ ग्रॅम सोन्याचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या सोन्याची अंदाजे किंमत सुमारे ५० लाख रुपये इतकी असल्याचे समजते.
हा अपहार १८ फेब्रुवारी ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झाला. या संदर्भात सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बँकेचे अधिकारी किरण विठ्ठल बारये, शिपाई अमोल आत्माराम मोहिते आणि कॅशियर ओंकार अरविंद कोळवणकर या तिघांवर संगनमत करून सोने गैरमार्गाने वळवल्याचा आरोप आहे.
हे सोने बँकेमध्ये तारण ठेवण्यात आले होते, मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(२), ३१६(४), ३१६(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली असून सहकारी बँकांमधील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
—
🔖 हॅशटॅग्स :
#रत्नागिरी #बँकफसवणूक #सोनेअपहार #CrimeNews #MaharashtraNews
📸 फोटो