🟪 “भाजप आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशांत यादव यांना ग्वाही
👉 मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन प्रशांत यादव यांना मिळाल्या शुभेच्छा
👉 भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती
मुंबई :- नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले कोकणातील उद्योजक प्रशांत यादव यांनी आज दुपारी मुंबईत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी “भाजप आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत” अशी ग्वाही देत यादव यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीत भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
१९ ऑगस्ट रोजी झालेला पक्षप्रवेश सोहळा मुसळधार पावसातही उत्साहात पार पडल्याचे कौतुकही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. “भाजपच्या माध्यमातून तुम्हाला कोकणात चांगले काम उभे करायचे आहे, पक्षाचा पूर्ण पाठिंबा तुमच्यासोबत आहे” असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी प्रशांत यादव यांच्यासोबत बळीराम मोरे, अनिलशेठ चिले, दीपक महाडिक, अनिलशेठ चव्हाण, अन्वरभाई जबले, दादा देवरुखकर, योगेश शिर्के, शमूनभाई घारे, रमणशेठ डांगे, शशिकांत साळवी, सुनील वाजे, अभिनव भुरण, फैसल पिलपिले, राहुल पवार, रुपेश आवले, राजेंद्र ठसाळे, नितीन महाडिक, कृष्णा लकेश्री, तसेच प्रशांत यादव यांचे स्वीय सहाय्यक गुलजार गोलंदाज आदी मान्यवर उपस्थित होते.
—
🏷️ हॅशटॅग्स :
#PrashantYadav #DevendraFadnavis #BJP #KonkanPolitics #MumbaiNews #RatnagiriVartahar
—
📸 फोटो