महावितरण कंपनीच्या जागेतील खैराची चोरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरण कंपनीच्या जागेतील खैराची चोरी

 

मंडणगड प्रतिनिधी .

मंडणगड: खैरतोडीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तालुक्यात जमीनमालकांच्या संमतीशिवाय खैर चोरून नेण्याgvच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दि. २० ऑगस्ट रोजी मंडणगड तालुक्यानजीक असलेल्या वीज महावितरण कंपनीचे पॉवरहाऊसचे परिसरातील खैराची दिवसाढवळ्या चोरी झाली. कादवण येथील खैरचोरीचे प्रकरण ताजे असताना तालुक्या शेजारी असलेल्या भिंगळोली गावात खैरचोरीचा प्रकार घडला आहे.

महावितरण कंपनीच्या मालकीच्या जागेतील खैराची चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र पोलिस आल्याचे पाहताच खैराची तोड करणारे घटनास्थळावरून पळून गेले. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खैराच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर चोरीसंदर्भात कोणताही छडा लागलेला नसताना शासनाच्या मालकीच्या जागेतील खैरावरच चोरांनी हात टाकला आहे. मोठ्या प्रमाणावर चोरी झालेला खैराचा माल कुठे पुरवला जात असेल? असा प्रश्न या निमित्ताने शेतकरी वर्गाला पडला आहे. खैरतोडीवरील निर्बंध शिथिल झाले असले तरी वाहतुकीसाठी परवाना आवश्यक आहे. वनविभागाकडे याकरीता रितसर मागणी करावी लागते.

असे असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात खैर व झाडांची कत्तल केली जात आहे. खैरचोरी प्रकरणामुळे वनविभागाचा हलगर्जीपणा समोर येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...