कोकणवासीयांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी भाजपाच्या वतीने मोफत बस.
मुंबई – प्रविणभाऊ पवार
भाजप मुंबई अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे पालकमंत्री नामदार ऍड आशिष शेलार यांच्या माध्यमातून रत्नागिरी, देवगड, मालवण, सावंतवाडी कोकणवासीयांची रहिवासी यांना कोकणात जाण्यासाठी मोफत बस योजनेअंतर्गत जिल्हा उपाध्यक्ष एड राजेश दाभोळकर, जिल्हा महिला मोर्चा विवेका दाभोळकर यांच्या वतीने अनिल आयकर व मारुती चौगुले बस प्रमुख यांच्या सहकार्याने दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता २ बसेस इंदिरा नगर पोलीस स्टेशन, पश्चिम द्रुतगती मार्ग, खार (पूर्व), मुंबई येथून सोडण्यात आल्या.
सर्व प्रथम जिल्हा अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी श्रीफळ फोडून पुजन केले. मग बस चालक किशोर कुमरे आणि वाहक सुभाष मोरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले. तर जिल्हा उपाध्यक्ष राजेश दाभोळकर यांनी जिल्हा विरेंद्र म्हात्रे यांचा सत्कार केला. तेव्हा त्यांनी दाभोळकर परिवाराचे कौतुक केले. पुढे म्हणाले की, गणेश उत्सव हा आता राज्य उत्सव घोषित केला आहे. भाजपा आणि मित्र पक्ष हे उत्सव प्रेमी पक्ष आहे. कोणत्याही सणाला आम्ही बंदी आणली नाही, आणि आणून देणार नाही. जेवढ्या जेवढ्या बंदी आणल्या होत्या ते सरकार आम्ही काढून टाकले आहेत. आणि यापुढेही या बंद्या राहणार नाही असा विस्वास देतो.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अनिल मिश्रा, एड. यश मिश्रा , ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अनिल आयकर, वॉर्ड अध्यक्ष ९४ नवनाथ दिघे, मा. वाॅर्ड अध्यक्ष लोकश दवे, दिनेश शिखरे, संदिप पवार,