बेनी बुद्रुक तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रशांत (बापू) वारीशे यांची बिनविरोध निवड!
ग्रामसभा एकमताने ठराव; ग्रामस्थ व सरपंचांकडून अभिनंदन
लांजा (जितेंद्र चव्हाण प्रतिनिधी) : लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक गावात झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत उर्फ बापू वारीशे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणारे व ग्रामविकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले वारीशे यांच्या निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना प्रशांत (बापू) वारीशे यांनी ग्रामस्थांचा विश्वास आणि पाठिंबा कायम राहील याची ग्वाही देत, “गावाच्या प्रगतीसाठी मी सदैव तत्पर राहीन,” असे आश्वासन दिले.
बेनी बुद्रुकमध्ये झालेल्या या सर्वानुमते निवडीमुळे गाव एकजुटीने तंटामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा संदेश दिला आहे.
#हॅशटॅग :
#Ratnagiri #LanJa #BeniBudruk #तंटामुक्तीसमिती #PrashantWarise #बिनविरोधनिवड