📍 निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार योजना
उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यालाही लाभ
रत्नागिरी, दि. 22 (जिमाका):- निर्धन घटकातील रुग्णांना धर्मादाय न्यास संचलित धर्मादाय रुग्णालये व वैद्यकीय केंद्रांमध्ये मोफत उपचार, तर दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेली योजना राबविण्यात आली आहे.
या योजनेनुसार निर्धन वर्गासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹1 लाख 80 हजार तर दुर्बल घटकासाठी उत्पन्न मर्यादा ₹3 लाख 60 हजार निश्चित करण्यात आली आहे. या उत्पन्न गटातील लोकांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे.
योजनेची सविस्तर माहिती टोल फ्री क्रमांक 1800222270 तसेच संकेतस्थळ www.charity.maharashtra.gov.in येथे उपलब्ध आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या यादीमध्ये खेड तालुक्यातील बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल, लवेल या रुग्णालयाचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.
—
🔖 हॅशटॅग्स :
#रत्नागिरी #वैद्यकीयउपचार #धर्मादायरुग्णालय #आरोग्ययोजना #CharityHospital #महाराष्ट्र
📸 फोटो