💥 गुहागर तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार
माजी आमदार संजयराव कदम व जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक
गुहागर~सुजित सुर्वे.
(२३ ऑगस्ट २०२५) : शिवसेना कार्यालय शृंगार तळी येथे आज शिवसेना गुहागर तालुका कार्यकारिणी, आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत शिवसेना उपनेते व आमदार संजयराव कदम यांचे मार्गदर्शन लाभले, तर शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या बैठकीत गुहागर तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, आगामी राजकीय वाटचाल व स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीस मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहिल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
या प्रसंगी दीपक कनगुटकर (तालुका प्रमुख), निलेश मोरे (शहर प्रमुख), अमरदीप परचुरे (युवा तालुका समन्वयक), महेश नाटेकर (मा. जि. उपाध्यक्ष), नैत्रा ठाकुर (मा. जि.प. सदस्य), नवनीत ठाकुर, प्रल्हाद विचारे (तालुका संघटक), प्रदीप सुर्वे, पराग कोळवणकर (विभाग प्रमुख), विशाल गोताड (उपविभाग प्रमुख), समीर महाडिक (युवा विभाग प्रमुख) यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
—
🔖 हॅशटॅग्स :
#शिवसेना #गुहागर #रत्नागिरी #संजयरावकदम #शशिकांतचव्हाण #शिवसैनिक
—