🟣⏩ रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २१ लाखांचा गुटखा जप्त, मग अन्न व औषध प्रशासन करतयं काय?
🚨 जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई, सांगलीतील दोघे जेरबंद; नागरिकांचा प्रश्न – गुटखा बंदी असूनही विक्री कशी सुरू?
रत्नागिरी :~वार्ताहर..
रत्नागिरी जिल्ह्यात गुटखा विक्रीचं जाळं दिवसेंदिवस फोफावत असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बल २१ लाख ४० हजार १६० रुपयांचा गुटखा जप्त करत मोठा धक्का दिला आहे.
साखरपा रस्त्यावर गस्त घालत असताना संशयित हालचाली करणारी चारचाकी पोलिसांच्या नजरेस पडली. गाडीची झडती घेतली असता हौद्यात गोण्या व पुठ्ठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला.
या कारवाईत विकास गंगाराम पडळकर (२८) आणि तेजस विश्राम कांबळे (२३), दोघेही रा. सांगली यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंमत तब्बल २१ लाख ४० हजार १६० रुपये असून वापरलेली चारचाकी गाडीही अंदाजे ७ लाख रुपये किंमतीची आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन ढेरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
🔎 मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा सापडत असतानाही अन्न व औषध प्रशासन नेमकं काय करतंय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे
🔖 हॅशटॅग्स :
#Ratnagiri #GutkhaSeizure #PoliceAction #FoodAndDrugAdministration #MaharashtraNews #CrimeNews #Konkan