🚌 खेड तालुक्यात एसटी सेवा ठप्प! गणेशोत्सवासाठी मुंबईला गाड्या धाडल्याने प्रवाशांचे हाल
ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद; विद्यार्थ्यांना, नोकरदारांना मोठा फटका
खेड : गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो एसटी बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील प्रवाशांवर झाला आहे. खेड आगारातून जवळजवळ सर्वच गाड्या मुंबईला पाठवण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नियमित बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून एसटी डेपोत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
ग्रामिण भागात जाणाऱ्या प्रवाशांना बससेवा बंद झाल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र त्यासाठी दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.