शनिवार दिनांक 30 रोजी चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या जिल्हा बैठकीचे आयोजन
जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, राज्य कार्यकारणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, सरचिटणीस आदेशभाऊ मर्चंडे यांची प्रमुख उपस्थिती.
आबलोली (संदेश कदम)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाची रत्नागिरी जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे सकाळी 11:00 वाजता जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रूके, दलित मित्र पुरस्कार प्राप्त आणि राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, सरचिटणीस आदेशभाऊ मर्चंडे यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची 1)नवीन पक्ष सदस्यांची नोंदणी करणे,2) पक्ष सदस्य व पदाधिकारी यांची नोंदणी नूतनीकरण करणे,3) दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षाच्या महाड येथे होणाऱ्या वर्धापन दिन महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन करणे, 4) जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत तालुका निहाय आढावा घेण्यात येणार आहे तरी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील जिल्हा आणि तालुका पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, सरचिटणीस आदेशभाऊ मर्चंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.