दारूबंदीचा ठराव फोल! ग्रामसभा ठरावाला धाब्यावर – वाटदमध्ये दारू विक्री सुरुच, जयगड पोलिसांचा धडक छापा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दारूबंदीचा ठराव फोल! ग्रामसभा ठरावाला धाब्यावर – वाटदमध्ये दारू विक्री सुरुच, जयगड पोलिसांचा धडक छापा

प्रतिनिधी:- श्री निलेश रहाटे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद मध्ये ग्रामसभा ठराव, सरपंच-उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील, जयगड पोलीस ठाणे यांच्या वारंवार ताकीदी नंतरही गावठी दारू विक्री थांबण्याऐवजी उघडपणे सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

गावामध्ये दारूबंदी लागू करून ग्रामसभेत ठराव पारित झाला होता. मात्र तो कागदावरच राहिला. ग्रामस्थांच्या व महिलावर्ग हयांनी वारंवार तक्रारीं नंतर अखेर जयगड पोलिस स्टेशनला चोरून दारूविक्री करणाऱ्या वर पुन्हा कारवाई करावी लागली. सूत्रांच्या खबरेवरून पोलिसांनी छापा टाकला असता वाटद किंजलेवाडी इथे श्री हरिचंद्र किंजले हे गावठी दारू विक्री करताना रंगेहात पकडले गेले.

या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच लिटर गावठी दारू जप्त केली असून त्याची किंमत अंदाजे पाचशे ते सहाशे रुपये असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलिस अधिकारी शिंदे व सोनावणे यांनी तपासणी केली.

ग्रामसभा ठराव, स्थानिक नेतृत्वाची ताकीद आणि ग्रामपंचायतीचा निर्णय धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे ग्रामस्थांत तीव्र संताप आहे. या प्रकरणी जयगड पोलिस स्टेशनकडून पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

Leave a Comment

आणखी वाचा...