मोठी बातमी! जरांगे पाटलांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी; पवार-ठाकरेंवरही संताप!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

मोठी बातमी! जरांगे पाटलांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी; पवार-ठाकरेंवरही संताप!

आझाद मैदान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वकिलांचे वक्तव्य; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचं बंधन असल्याचा पुनरुच्चार

 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दुसऱ्या दिवशी पोहोचलं असताना, या प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगे यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली. यानंतर सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केली आहे.

सदावर्ते म्हणाले की, “कायद्यापुढे कोणीही मोठं नाही. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी आहे. त्यानंतर जरांगे मैदानात थांबले तर चुकीची परंपरा पडेल. कायद्याचा भंग होईल. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्यांना ताबडतोब अटक करून मॅजिस्टेटसमोर उभं केलं पाहिजे. कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही.”

याचबरोबर त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदेंवरही भाष्य केलं. “जरांगे यांनी कुणबी आणि मराठा एक करण्याची मागणी केली, गॅझेटियर डिक्लेअर करण्याची मागणी केली. शिंदे यांनी ठामपणे सांगायला हवं होतं की हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शक्य नाही. मात्र ते बोलले नाहीत, ही खंत आहे,” असं सदावर्ते म्हणाले.

🚫 “गुन्हे मागे घेऊ नका” – सदावर्ते

जरांगे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. यावरही सदावर्ते यांनी आक्षेप घेतला. “पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यात आला आहे, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहिलं आहे. अशा गुन्हे मागे घेणं म्हणजे न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गुन्हे मागे घेण्यास बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे सरकारने कुठल्याही परिस्थितीत हे गुन्हे मागे घेऊ नयेत,” अशी मागणी त्यांनी केली.

आता सदावर्तेंच्या या विधानांना मनोज जरांगे पाटील कसं उत्तर देतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

हॅशटॅग्स

 

#MarathaReservation #ManojJarange #GunratnaSadavarte #AzadMaidanAndolan #MumbaiProtest #MaharashtraPoliti

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...