जिल्हाभरात गणरायाला भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका

💥💥 ब्रेकींग बातमी

🟣 जिल्हाभरात गणरायाला भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका

रत्नागिरी – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवारी ढोल-ताशांच्या गजरात, बेंजोच्या तालावर वाजत-गाजत, जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. काही ठिकाणी वरुणराजानेही हजेरी लावून वातावरण अधिक मंगलमय केले.

 

गणेशोत्सवाच्या कालावधीत दरदिवशी पूजा, आरती, भजन, जाखडी, महिलांचे टिपरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गावोगावी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सहा दिवस लाडक्या बाप्पाची सेवा-पूजा करून भक्तांनी आज जड अंत:करणाने निरोप दिला.

 

जिल्ह्यात दुपारी ३ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली. गणेशभक्त नाचत-गात सहभागी झालेले दिसले. विसर्जन स्थळी पोहोचल्यावर आरती करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

#GanpatiVisarjan #Ratnagiri #Sindhudurg #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2025

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें