“जनता, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्र आणणारे माध्यम म्हणजे आमसभा” – आमदार भास्करशेठ जाधव

“जनता, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्र आणणारे माध्यम म्हणजे आमसभा” – आमदार भास्करशेठ जाधव

 

गुहागर आमसभेनंतर आमदारांचा पत्रकार परिषदेत खुलासा; जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचारावर टीका

 

आबलोली (संदेश कदम) :

गुहागर तालुक्यातील श्री. पूजा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या आमसभेनंतर बोलताना आमदार भास्करशेठ जाधव यांनी आमसभेच्या परंपरेवर ठाम भूमिका मांडली. “जनता, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर एकत्र येतात, ती संधी केवळ आमसभा देते. त्यामुळे विकासाच्या गतीसाठी ही परंपरा मी आजतागायत कायम ठेवली आहे,” असे ते म्हणाले.

 

जलजीवन मिशनवर बोलताना त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचा बोजवारा उडालेला आहे, त्यात रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती तर आणखी बिकट आहे. भ्रष्टाचार, अनियमितता आणि नियमबाह्य काम मोठ्या प्रमाणात झाले असून, पैशांची उचल मात्र अफाट झाली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पुराव्यानिशी मांडणी केली होती. त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले, मात्र आजवर कोणतीच कारवाई झालेली नाही,” असा आरोप जाधव यांनी केला.

 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “आमच्या तीन पक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, विधानसभा हे पद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे राहील, तर विधानपरिषद विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे दिले जाईल. त्यामुळे अंबादास दानवे यांची मुदत संपल्यानंतर काँग्रेसला ही जबाबदारी देण्याचे ठरले आहे. सरकार याबाबत अंतिम निर्णय घेईल.”

 

दरम्यान, कृपाल तुमाने यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भास्करशेठ जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी त्यांना ओळखत नाही.”

 


 

 

📌 हॅशटॅग्स :

 

#गुहागर #भास्करशेठजाधव #आमसभा #जलजीवनमिशन #रत्नागिरी #महाराष्ट्रराजकारण

 

📷 फोटो

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें