राजापूर तालुक्यातील पडवे गावामध्ये चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्यातील पडवे गावामध्ये चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ …..

 राजापूर – (दिनेश कुवेस्कर) –  राजापूर तालुक्यातील पडवे गावामध्ये चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ ..होताना दिसत आहे काही महिन्यापूर्वी दागिन्याची मोठी चोरी झाली होती पण चोरांचा अद्याप सुगावा लागला नाही आणि अशा बारीक-सारीक चोऱ्या होताना दिसत आहेत अशी एक चोरी गुरुवारी मध्यरात्री निबंध ऑटो गॅरेज पडवे येथून MH 08 2170 ही गाडी संतोष तावडे विलये यांनी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी गाडी ठेवली होती सदर गाडी रात्री चोरट्यांनी बंद स्थितीत असताना लांबवली आहे त्यामुळे  ग्रामस्था मध्ये भिती चे वातावरण आहे पडवे येथे चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत आहे याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने चोर मोकाट फिरताना दिसत आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे या चोरांवर आळा बसलाच पाहिजे नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होऊन चोर अजून मोकाट होणार आहेत. राजापूर पोलीस प्रशासन वेळीच लक्ष घालून जनतेला सहकार्य करावं अशी लोकांची भावना आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...