राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता

breking news

 

🟪 राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू; ३० जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण होणार

 

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक टप्पा स्वतंत्र असेल, अशी माहिती समोर येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार –

८ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल.

१४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येतील.

२७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी अधिसूचित दिनांक म्हणून वापरण्यात येईल. विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवूनच याद्या तयार केल्या जाणार आहेत.

 

निवडणूक आयोगाच्या या तयारीनंतर राज्यात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यांत निवडणुकीचा धुरळा उडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

 

हॅशटॅग्स:

#MaharashtraElections #LocalBodyElections #ZP #PanchayatSamiti #ElectionCommission #BreakingNews #RatnagiriVartahar

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें