पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गमरे सेवानिवृत्त : पोलिस अधीक्षक नितीन बघाटे यांच्यातर्फे सन्मान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गमरे सेवानिवृत्त : पोलिस अधीक्षक नितीन बघाटे यांच्यातर्फे सन्मान

नवीमुंबई (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र सध्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप गमरे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. पोलिस अधीक्षक नितीन बघाटे यांनी गमरे यांचा पोलिस दलातर्फे सन्मान करून निरोप देण्यात आला. तसेच सावर्डे पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे देखील सन्मान करण्यात आला. या दोन्ही सत्काराने सेवानिवृत्त प्रदीप गमरे भारावून गेले होते. यावेळी गमरे दांपत्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

पोलीस खात्यातील झुंझार पोलीस म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास उलगडून त्यांनी पोलीस खात्याचे नाव उज्ज्वल केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, खेड, रामपूर, चिपळूण, सावर्डे या पोलीस स्थानकात यशस्वी कामगिरी केली आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास करुन आरोपींना जेरबंद केले आहे. तर सर्व सामान्यांच्या तक्रारी सोडवून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

सध्या ते चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस स्थानकात कार्यरत होते. पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून असंख्य गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलीस खात्यात सेवा सुरू झाल्यानंतर हवालदार, हेड कॉन्स्टेबल, पोलीस अमलदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा प्रवास राहिला आहे. अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचा हातखंडा असे. गतवर्षी महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस महासंचालक पदकाने सन्मान झाला आहे.

तर काही महिन्यांपूर्वी प्रदीप अर्जुन गमरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली. या पदाला देखील त्यांनी न्याय दिला आहे. तर आता नुकतेच प्रदीप गमरे सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे पोलिस अधीक्षक नितीन बघाटे यांनी गमरे यांचा सन्मान करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर त्यांच्या पत्नी सौ. प्रेरणा गमरे यांचा देखील पोलीस दलातर्फे सन्मान करण्यात आला.

तसेच सावर्डे पोलीस ठाण्यातर्फे प्रदीप गमरे यांचा सन्मान करीत पोलीस दलातील कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा देत ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक राहिले आहेत. ते नेहमीच स्मितहास्य असत. तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेत पुढील कार्यवाही करीत असत. यामुळे तक्रारदारांचे समाधान होत असे. तसेच गमरे यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा देखील झाल्या आहेत. एकंदरीत प्रदीप गमरे यांची पोलीस दलातील कारकीर्द यशस्वी झाली असल्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच उपस्थित मान्यवरांनी सांगितले. हा कार्यक्रम आगवे येथील भागीर्थीबाई शिर्के मंगल कार्यालयात झाला.

यावेळी सावर्डेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी तसेच सावर्डेचे माजी सुभाष मोहिरे, राजा यादव, संतोष खैर, सावर्डेचे पोलीस पाटील, अजित गमरे, निलेश गमरे, अभिजीत मोहिते, संतोष सावर्डेकर, बाळू कोकाटे तसेच प्रदीप गमरे यांचे कुटुंबीय नातेवाईक व सावर्डेतील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस गगनेश पटेकर यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला