सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा जन आक्रोश! जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या सदभाव मंचचा मोर्च्यात सहभाग

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा जन आक्रोश!

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या सदभाव मंचचा मोर्च्यात सहभाग

ओरोस (सिंधुदुर्ग): जिल्ह्यात वाढत्या असंवैधानिक आणि अन्याय्य घटनांविरोधात तसेच बांदा येथील तरुण आफताब कमरुद्दीन शेख आत्महत्या प्रकरणी न्याय आणि शांततेसाठी सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर सर्वधर्मीय धडक मोर्चा काढण्यात आला. सावंतवाडी येथील ‘आम्ही भारतीय’ या पुरोगामी संघटनेने आयोजित केलेल्या या मोर्च्यात सिंधुदुर्गातील मुस्लिम बांधवांसह विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. संपूर्ण मोर्चा संविधानसम्मत, शिस्तबद्ध आणि शांततामय पद्धतीने पार पडला.

✅ आफताब शेख प्रकरणी न्यायाची मागणी

अलीकडेच बांदा येथील तरुण आफताब कमरुद्दीन शेख याने झालेल्या कथित छळ, व्यावसायिक अडथळे आणि अन्यायामुळे आत्महत्या केली. या घटनेमुळे मुस्लिम समाजासह सर्व संवेदनशील नागरिकांमध्ये तीव्र संताप व वेदना व्यक्त होत असून न्यायाची मागणी तीव्र झाली आहे. “संविधानातील मूल्यांचा सन्मान, शांती, बंधुभाव, एकात्मता सुरक्षित ठेवण्यासाठीच हा मोर्चा आहे,” असे आयोजकांनी सांगितले.

✅ “आम्ही कमी पडलो, त्याबद्दल कुटुंबियांची माफी” – कमलताई परुळेकर

ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर म्हणाल्या,

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजावर कट्टर हिंदुत्ववादी शक्तींनी अन्याय सुरू केला आहे, हे आम्हाला मान्य नाही. आफताब प्रकरणात ‘आम्ही भारतीय’ म्हणून आपण कमी पडलो, त्यामुळे त्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. त्याबद्दल आम्ही त्याच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागतो.”

सदभाव मंचचा सहभाग – चौकशी समितीही उपस्थित

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या सदभाव मंचने या मोर्च्यात सक्रीय सहभाग घेतला. आफताब प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी समिती सावंतवाडीला आली होती. समितीतील सदस्यही मोर्चात सहभागी झाले.

✅ “जर घटना थांबल्या नाहीत, तर मोठे जन आंदोलन” – इब्राहिम खान

दलित व अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचारांबाबत राज्यभरातील आकडेवारी सादर करत समन्वयक इब्राहिम खान म्हणाले,

“आपण सर्वांनी एकत्र राहून अशा घटनांना आळा घालायलाच हवा. जर अत्याचार थांबले नाहीत तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे केले जाईल.”

✅ “इथे धर्मासाठी नाही, भारतीय म्हणून जमलो आहोत”

मोर्च्यात सहभागी एजाज नाईक व सहकाऱ्यांनी सांगितले,

“हा मोर्चा मुसलमानांचा नसून भारतीयांचा आहे. सिंधुदुर्गातील सामाजिक सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न कोणीही करू देणार नाही. आम्ही एकत्र आलो आहोत, कारण संविधान हा आमचा धर्म आहे.”

मोर्चादरम्यान नागरिकांनी शांतता, बंधुभाव, न्याय, संविधान जिंदाबाद यांसारख्या घोषणांद्वारे आपला निषेध आणि एकता व्यक्त केली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला