“मला सत्तेची पर्वा नाही, मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे’. मा. उधवजी ठाकरे
छ. संभाजी नगर- (वार्ताहर) “मला सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. मला तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे. सत्ता येत असते आणि सत्ता जात असते. गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, एक लक्षात घ्या, एकजूट महत्त्वाची आहे. जे फोडाफोडीचे राजकारण शिवसेनेबरोबर करण्यात आले. हे जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांबरोबर करतील. हे सरकार गेल्यात जमा आहे. खरे तर महायुतीच्या नेत्यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवले पाहिजे, असा निर्धार करायला हवा’, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी एल्गार केला.
Shiv Sena UBT: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, दौरे, सभा यांना वेग येताना पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरे शिर्डी, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या महाअधिवेशनाला उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी ठाकरे गटातील नेत्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेना UBT चे सर्व नेते आणि पदाधिकारी ही या मेळा्यासाठी हजर होते,त्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा नव्याने अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्र्वासित केले.