आदिशक्ती अभियान राबवणेबाबत साटवली ग्रामपंचायतीत विशेष सभा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आदिशक्ती अभियान राबवणेबाबत साटवली ग्रामपंचायतीत विशेष सभा उत्साहात संपन्न

ग्राम स्तर समिती मार्फत या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

लांजा, प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण

राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियान अंमलबजावणीच्या अनुषंगाने साटवली ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामस्उतर समिती ची सभा उ त्साहात पार पडली. शासन निर्णयानुसार ग्रामस्तरावर आदिशक्ती समिती स्थापन करून अभियान प्रभावीपणे राबवण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता साटवली ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्तर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शासन परिपत्रकाचे वाचन करून त्यानुसार विविध उपक्रम राबवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. साटवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडी-वस्तीमध्ये जाऊन जनजागृती करणे, विविध शिबिरे (कॅम्प) आयोजित करणे तसेच शासन परिपत्रकानुसार समितीला दिलेल्या अधिकारांनुसार उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला.

यावेळी शासन परिपत्रकाचे वाचन व मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी केले. सभा ग्रामस्तर समिती अध्यक्ष श्रीम. शबाना मुनीर इस्साफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरपंच श्री. दत्ताराम सावंत, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, सचिव श्रीम. संजना संतोष बाकाळकर, पुरुष प्रतिनिधी जहीर कोंडकरी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रवीण ठाकूरदेसाई, पोलीस पाटील सदानंद किल्लेकर, अंगणवाडी सेविका श्रीम. दर्शना तरळ, श्रीम. बाणे व श्रीम. बरमारे उपस्थित होते.

सभेमध्ये महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय क्र. आदिपु/२०२५/प्र.क्र.१५/का-१० (दि. २२ मे २०२५) तसेच संबंधित इतर शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. सन २०२५–२६ पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आली असून महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावर या अभियानाचा भर आहे.

या अभियानांतर्गत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रम व कार्यक्रमांची प्रभावी जनजागृती करण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामस्तर समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

आदिशक्ती अभियानाचे प्रमुख उद्देश

महिलांच्या आरोग्य समस्या संवेदनशीलपणे हाताळणे

कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे

बालविवाह रोखणे व मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवणे

महिला व बालकांवरील हिंसाचारास प्रतिबंध

महिला नेतृत्व सक्षम करून पंचायतराज व्यवस्थेत सहभाग वाढवणे

शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार