वाटद-मिरवणे ग्रामपंचायत अद्याप स्वतंत्र ग्रामसेवकाविना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

योजना राबवायच्या कुणी? ग्रामसेवक महिन्यातून एक-दोन दिवसच गावात

वाटद-मिरवणे ग्रामपंचायत अद्याप स्वतंत्र ग्रामसेवकाविनापी

रत्नागिरी:- निलेश रहाटे

साधारण साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या वाटद-मिरवणे महसूल ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये ग्रामपंचायतीत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या आधारे डिसेंबर 2024 मध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांना ग्रामपंचायत मार्फत लेखी पत्र देण्यात आले. मात्र आज जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा संबंधित प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

सध्या कार्यरत असलेला ग्रामसेवक आजून दोन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त भार सांभाळत असल्याने वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीसाठी आवश्यक वेळ देऊ शकत नाही. ग्रामसेवकाचा अधिकृत वार शुक्रवार असतानाही प्रत्यक्षात महिन्यातून एक-दोन वेळाच त्यांची उपस्थिती होत आहे. उर्वरित काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, चौकशी-सुनावणी व इतर कार्यालयीन कामांमुळे ग्रामसेवक गावात उपलब्ध नसतो.किंवा अतिरिक्त ग्रामपंचायत मीटिंग.

या परिस्थितीचा थेट परिणाम मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), हर घर जल / जल जीवन मिशन, ग्राम स्वराज, विविध डिजिटल उपक्रम तसेच इतर शासन योजनांच्या अंमलबजावणी वेळेत होत नाहीत. ग्रामसेवकाकडे पुरेसा वेळ नसल्याने लाभार्थी निवड, ऑनलाईन नोंदी, प्रस्ताव सादरीकरण, तपासणी व अनुदान प्रक्रिया वेळेवर होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

याशिवाय विकास कामांचे प्रस्ताव, ग्रामस्थांच्या अर्जांवरील निर्णय, माहिती अधिकाराच्या अर्जांवरील उत्तरे तसेच योजनांशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता यामध्येही मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे. परिणामी ग्रामस्थ शासनाच्या योजनांपासून प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत आहेत.

एकीकडे शासन ग्रामस्वराज, डिजिटल पंचायत व सर्वसमावेशक ग्रामीण विकासाच्या घोषणा करत असताना, दुसरीकडे त्या प्रत्यक्षात राबवण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत प्रशासकीय यंत्रणा पुरवण्यात अपयश दिसून येत आहे. ग्रामपंचायत, ग्रामसभा व ग्रामस्थांचा स्पष्ट ठराव असूनही स्वतंत्र ग्रामसेवक न देणे म्हणजे पारदर्शकतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

“ग्रामपंचायतीचा ठराव आणि अधिकृत पत्र असूनही जर वर्षभर निर्णय होत नसेल, तर ग्रामपंचायतींचे अधिकार व ग्रामस्थांचे हक्क काय उपयोगाचे?” असा थेट सवाल RTI कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे व ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन स्वतंत्र ग्रामसेवक नियुक्त न केल्यास, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा RTI कार्यकर्त व पत्रकार निलेश रहाटे व गावातील जागृत ग्रामस्थांनी दिला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा