जनशक्तीच्या जोरावर विकास कामांची स्वप्ने नक्कीच पूर्ण करू – मनसेचे प्रमोद गांधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जनशक्तीच्या जोरावर विकास कामांची स्वप्ने नक्कीच पूर्ण करू – मनसेचे प्रमोद गांधी

आबलोली (संदेश कदम):

जनता सुज्ञ असून तिला केवळ विकास हवा आहे. गुहागरमधील जनता धनशक्तीला झुकणार नाही, तर विकासालाच प्राधान्य देईल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी व्यक्त केला.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर उपस्थित होते.

प्रमोद गांधी पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून आदरणीय भास्करशेठ जाधव यांनी ही जागा माझ्यासाठी सोडल्याने मी स्वतः या गटातून निवडणूक लढवत असल्याचे प्रमोद गांधी यांनी सांगितले. तसेच शृंगारतळी पंचायत समिती गणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून संजय पवार, तर तळवली पंचायत समिती गणातून संदीप धनावडे हे उमेदवार निवडणूक लढवत असून आम्ही तिघेही एकत्रितपणे जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचे आव्हान असल्याचे सांगत प्रमोद गांधी म्हणाले, “आमच्याकडे पैसा नसेल, पण आमच्याकडे जनता जनार्दन आहे. जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आदरणीय भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात चांगला विकास सुरू आहे आणि त्याच धर्तीवर गावोगावी, खेडोपाडी आवश्यक असलेली सर्व विकासकामे आम्ही पूर्ण क्षमतेने पूर्ण करू.”

लोकांच्या विकासाची जी स्वप्ने आहेत, ती नक्कीच प्रत्यक्षात उतरवू, असा ठाम विश्वास मनसेचे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात