जि. प. प्राथमिक शाळा जांभारी कुणबीवाडी येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि. प. प्राथमिक शाळा जांभारी कुणबीवाडी येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा

 

रत्नागिरी :- निलेश रहाटे

जांभारी कुणबीवाडी (ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी) येथील जि. प. प्राथमिक शाळेत सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री. मोहन प्रकाश घोंगडे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षण तज्ञ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित संगीत कवायत सादर केली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी “Say No To Plastic” या गीतावर आधारित नृत्य व पथनाट्याचा संयुक्त परफॉर्मन्स सादर करून प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी प्रभावी जनजागृती केली.

यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिकविरोधी घोषणा, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तसेच मतदान जनजागृतीविषयक घोषणा देत उत्साहात सहभाग घेतला. या फेरीस शिक्षक, पालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रभात फेरीनंतर शाळेमध्ये सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. मोहन प्रकाश घोंगडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकारी शिक्षक श्री. अतुल मोहन सानप यांनी केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]