कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

मुंबई – संदीप शेमणकर

गुहागर तालुक्यातील मौजे उमराठ गावातील कोंडवी वाडी येथील ग्रामीण मूलभूत गरजा आणि आर्थिक निधीची उपलब्धता व्हावी वाडीच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ (रजि.) , उमराठ यांच्या वतीने रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दु. ४ वा. साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई येथे कोकणची अस्सल लोककला अर्थातच श्री नवलाई देवी नमन मंडळ उमराठ यांच्या सहयोगाने बहुरंगी नमनाचा कार्यक्रम करण्यात आला, त्या प्रयोगास नमन रसिकांनी उदंड प्रतिसाद देऊन सदर कार्यक्रम हाऊसफुल्ल केला. या कार्यक्रमाला, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, नमन नाट्य रसिक उपस्थीत राहून उत्तम प्रतिसाद दिला, संपूर्ण कार्यक्रमाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

सदर नमन, कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळाने सादर केले, त्यात वाडीतील उच्चशिक्षित पुरुष, पदवीधर , पदवित्तर, मॅनेजर, शिक्षक, CA अशा विविध प्रोफेशनल पदावर असणाऱ्या कलाकारांनी काम करून, आपली कोकणची पारंपरिक लोककला “नमन” मुळ स्वरूपात सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

‌‌. वैभव धनावडे यांच्या सुंदर अशा गौळण लेखणीने आणि गोड गळ्याचे गायक योगेश गावणंग यांच्या सुमधुर गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना मोलाची साथ गायक श्री. संदेश धनावडे यांनी दिली. सर्व कलाकारांनी जीव ओतून काम करून गौळण सुरेख आणि रंगतदार बनवली, यात कृष्ण, राधा, गवळणी आणि मावशी, सुदामा, पेंद्या, लंगड्या यांनी विनोदाची आतषबाजी करत अजून रंगत वाढवली.

मध्यंतरानंतर मंगेश गावणंग लिखित ‘लास्ट ईस्टॉप कोकण’ हे कोकणातील सध्यस्थितीवर भाष्य करणारे, विनोदी तसेच समाज प्रबोधन करणारे फार्स ने तर धम्माल उडवून दिली. फार्स मधील विनोदी संवाद, प्रसंग, जमिनी न विकण्याचे आणि व्यसनाच्या आहारी न जाण्याचे , कोकण जपण्याचे मोलाचे संदेश रसिकांना विशेष भावले.

या नमनाचे दिग्दर्शन वैभव धनावडे, गीतकार व गायन योगेश गावणंग, संगीतकार : संदेश आंबेकर, अक्षय नावले, कुंदन साळवी, नृत्यदिग्दर्शक गणेश पुजारी, सुत्रधार मनोज गावणंग तर निर्मिती कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ यांची होती.

या नमनात नवलाई देवीचे पारंपरिक खेळे, नाविण्यपूर्ण “गण-गौळण”आणि फार्स लास्ट ईस्टॉप कोकण, असा संपूर्ण कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना खास पर्वणीच ठरला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोंडवी वाडीतील सर्व मुंबईतील ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते आणि उमराठ गावातील सर्व स्थानिक आणि मुंबईतील कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, हे विविध सामाजिक, प्रबोधनपर नाटके व दर्जेदार नमन सादर करणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. त्यांची ही लोकप्रियता पाहून रसिकांनी प्रचंड गर्दी करून हा कार्यक्रम हाऊसफुल्ल आणि यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार

सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार : वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेवकांची...
Read More
सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर मुंबई विभागात सर्वाधिक...
Read More

मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

मुंबई महानगरपालिकेतील चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  मुंबई महापालिका: 'मातोश्री'वरून मध्यरात्री फोन...
Read More
मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

. अखेर तो क्षण आला! समर देणार स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा नवा प्रोमो व्हायरल! वरळीचा कट्टा...
Read More
वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर...
Read More
महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू