वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

प्रतिनिधी :- निलेश रहाटे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावात दि. 1 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:29 वाजल्यापासून जिओ नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले असून एक तास रेंज गायब असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अचानक नेटवर्क बंद पडल्यामुळे नागरिकांसह शासकीय कार्यालये व शाळांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. विशेषतः तातडीची ऑनलाईन कामे पूर्ण करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा प्रश्न वारंवार उद्भवत असून — कॉल लवकर न लागणे, कॉल मध्येच कट होणे, इंटरनेट अत्यंत संथ किंवा पूर्णपणे बंद होणे.

यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. रिचार्ज करूनही योग्य सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सेवा दर्जाबाबतचे नियम असतानाही, त्यांचे पालन होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित कंपनीने तात्काळ दखल घेऊन सेवा पूर्ववत करावी व कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें