महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

rv ad

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप

मुंबई : महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत देशात दुसरे स्थान मिळवले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या योजनांमुळे ही ऐतिहासिक वाढ शक्य झाली आहे.

2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून तब्बल 7,343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली असून 2020-21 मधील 3,684 कोटी रुपयांच्या तुलनेत निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. निर्यातीचे परिमाणही वाढून 2.27 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे.

राज्याच्या या यशामध्ये कोकण किनारपट्टी हा मुख्य कणा ठरला आहे. विशेषतः कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीच्या निर्यातीचा मोठा वाटा आहे. कोकणातील कोळंबीला अमेरिका, चीनसारख्या देशांमध्ये मोठी मागणी असून तिची गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशी ग्राहकांमध्ये ती लोकप्रिय ठरत आहे.

नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि निर्यात वाढीसाठी विविध योजना राबवल्या. त्यामुळे कोकणातील मच्छीमारांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले गेले आहे.

भारताच्या एकूण मत्स्य निर्यातीत अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली असून 2024-25 मध्ये 22,723 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. त्यानंतर चीन (10,668 कोटी), युरोपियन युनियन, दक्षिण-पूर्व आशिया आणि जपान या देशांमध्येही भारतीय मासळीची मोठी मागणी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या आव्हानांवर मात करत महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेशासारख्या राज्यांच्या स्पर्धेत आपले स्थान मजबूत ठेवले आहे.

एकूणच, मंत्री नितेश राणे यांच्या धोरणात्मक निर्णयांमुळे आणि कोकणातील मच्छीमारांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्राची कोळंबी सातासमुद्रापार पोहोचत असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें