पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

📍 रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साईनगर सात बंगल्यामागे घडलेल्या सूरज राजाराम झोरे खून प्रकरणामागील धक्कादायक कारणे पोलिस तपासात समोर आली आहेत. मित्र असलेल्या सूरज झोरेचा खून हा प्रेयसीबाबत कान भरल्याच्या संशयातून आणि जुन्या वादाच्या रागातून करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य संशयित सोहम एकनाथ म्हात्रे याच्या प्रेयसीला सूरज झोरे हा सतत “सोहमचा नाद सोड” असे सांगत होता. ही बाब सोहमला समजल्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर एका पार्टीदरम्यान सूरज आणि सोहम यांच्यात वाद झाला होता. या वादात सूरजने सोहमच्या श्रीमुखात भडकावल्याने सोहमच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता.

गुरुवारी रात्री ९.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान सूरज झोरे कामानिमित्त रत्नागिरीत आल्याची माहिती मिळताच सोहम म्हात्रे याने त्याला फोन करून साईनगर सात बंगल्यामागे बोलावून घेतले. सूरज घटनास्थळी पोहोचताच सोहमने बॅगेतून कोयता काढून त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सूरजवर तब्बल ३१ वार करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना सूरज झोरेचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शहर पोलिसांनी मुख्य संशयित सोहम एकनाथ म्हात्रे (१८, रा. शांतीनगर, रसाळवाडी) याच्यासह अभिषेक राठोड (२२, रा. आदिनाथ नगर) आणि नजिबूल शेख (२१, रा. शांतीनगर, रसाळवाडी) यांना अटक केली आहे.

दरम्यान, तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सहायक सरकारी वकील निलंजन नाचणकर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना २ जूनपर्यंत १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


SEO Keywords:

Ratnagiri murder case, Suraj Zore murder, Soham Mhatre arrest, Ratnagiri crime news, Sai Nagar murder case, Ratnagiri latest news, Maharashtra crime news, कोयत्याने खून, रत्नागिरी खून प्रकरण

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें