चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

uday

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण; विधान परिषद निवडणुकीनंतर ‘कर्ते-धर्ते’ उघड करणार असल्याचा इशारा

मुंबई | प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे आरोप होत असताना राज्याचे उद्योगमंत्री यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. “या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही. विनाकारण माझी बदनामी करू नका,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले आहे.

सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची चुरस रंगली असून तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत सुमारे ६० उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक बिनविरोध होणार की विविध आघाड्यांमध्ये रंगणार, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अभिनेत्री या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. निवडणुकीत एका मंत्र्याचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अभिनेते यांनीही एका मंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याकडून निवडणुकीत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला होता.

या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून या विषयावर माझे नाव चर्चेत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत माझा हस्तक्षेप झाल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. मात्र, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी खात्री करून घ्यावी.”

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “ही निवडणूक तीन वर्षांपूर्वी भरलेल्या अर्जांवर आधारित आहे. त्यामुळे या प्रक्रियेशी माझा कोणताही संबंध नाही. विधान परिषद निवडणुका संपल्यानंतर या प्रकरणातील खरे कर्ते-धर्ते कोण आहेत, हे मी समोर आणेन.”

उदय सामंत यांच्या या स्पष्टीकरणानंतर चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीभोवतीचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कीवर्ड्स : उदय सामंत, चित्रपट महामंडळ निवडणूक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, निलम शिर्के सामंत, विजय पाटकर, मराठी चित्रपटसृष्टी, महाराष्ट्र राजकारण, ताज्या बातम्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

दिव्यांगजनांसाठी अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण; ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’च्या अंतिम निवड प्रक्रियेला प्रारंभ

दिव्यांगजनांसाठी अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण; ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’च्या अंतिम निवड प्रक्रियेला प्रारंभ मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): यशवंतराव चव्हाण सेंटर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता...
Read More
दिव्यांगजनांसाठी अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण; ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’च्या अंतिम निवड प्रक्रियेला प्रारंभ

बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

■ *बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन* ■ *काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केली...
Read More
बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा   काँग्रेस 8, शिवसेना (उबाठा) 4...
Read More
विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात महायुतीत अनिकेत तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवरून...
Read More
कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे...
Read More
राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त  आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे माहिती...
Read More
केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याबाबतची वस्तुस्थिती समोर; राज्य संरक्षित...
Read More
गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात