रत्नागिरी जिल्ह्यातील औषध विभागाकडून राजापूर मधील आपल्या मर्जीतील डॉक्टरांना अभय
औषध विभागाकडे होताच तक्रार ताबडतोब डॉक्टरांना होतो साक्षात्कार
*समिर शिरवडकर- रत्नागिरी
राजापूर:- राजापूर तालुक्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग रत्नागिरी यांच्याकडून राजापूर तालुक्यातील डॉक्टरांना मेडिसिन बाबत अभय असल्याचे काही दिवसांपूर्वीच निदर्शनास आले आहे, याबाबत सविस्तर माहिती घेतली असता, औषध विभाग यांच्याकडे तालुक्यातील काही डॉक्टरांची तक्रार केली असता, त्याचं कारण असं की ते डॉक्टर राजापूर तालुक्यातील स्वतःच्या नावे मेडिसिन विकत घेऊन ती रुग्णांना आपल्याच क्लिनिकमध्ये भरमसाठ किमतीमध्ये विक्री करून त्याचा नफा कमवून आपल्या प्रॉपर्टी मध्ये अधिकाधिक वाढ करीत असल्याचे दिसून येत असल्याचे काही सुज्ञ नागरिकाकडून ठराविक डॉक्टरांच्या तक्रारी औषध विभागाकडे केली असता त्या तक्रारी परस्परी औषध विभागाकडून संबंधित डॉक्टराला कसे काय समजते ? आणि त्या डॉक्टरांची रात्री अपरात्री आपल्या मेडिसिन लपवण्यासाठी का धावपळ होते हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे? यात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील औषध विभागाचा संपूर्ण पाठिंबा या डॉक्टरांना का आहे याचं मात्र कोंडं अजून पर्यंत उलगडले नाही, यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे ठिकठिकाणी नागरिकांकडून तसेच परिसरातील मेडीकल कडून सांगण्यात येत आहे.
औषध आणि सौंदर्य प्रसाधने नियम १९४० व १९४५ यानुसार संबंधित डॉक्टर NRX आणि H1 या मेडिसिन बाबत विक्री करण्यासाठी काही नियम अटी शर्ती लागू आहेत की नाही याची स्पष्टता नसल्याने याबाबत माहिती अधिकार अर्ज दाखल केला असता आमच्याकडे संबंधित विभागाचे कागदपत्र उपलब्ध नाहीत अशा आशयाचे पत्र मिळाले असून, या पत्रामध्ये काही तथ्य नसून, परंतु या माहितीमध्ये विचारलेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित वितरकांकडू या माहितीची माहिती घेऊन संबंधित तक्रारदाराला पुरविली असती तर औषध विभागामध्ये झालेला घोटाळा उघडकीस आला असता जेणेकरून सामान्य रुग्णांचे होणारे हाल किंवा त्यांची स्टिरोइड पासून सुटका झाली असती, परंतु तालुक्यातील डॉक्टरांना फक्त आपला स्वार्थ बघण्यासाठी वेळ आहे,मात्र रुग्णाच्या भवितव्यशि आपला काही समंध नाही, डॉक्टरांना फक्त आणि फक्त आपली प्रॉपर्टी कशी वाढेल याकडे लक्ष असून यांच्यामध्ये खत पाणी घालत आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यातील औषध विभाग, यापूर्वी अनेक वेळा तक्रारी होऊन सुद्धा तक्रार पोहोचण्याच्या आधीच औषध विभागाचे अधिकारी संबंधित डॉक्टरांना फोन करून त्यांना सावध करून पाहणी दौरत मात्र कोणताही पुरावा आढळू येतं नाही,अशी परिस्थिती कित्येक वर्ष औषध विभाग करीत आहेत.
या सर्वांकडे सध्याचे नवीन डॅशिंग आयुक्त सन्माननीय मुंडे साहेब लक्ष देतील का? आणि तालुक्यातील औषधांचा काळाबाजार संपुष्टात येईल का? हे पहावं लागेल.
*आम्हीं आमच्या विभागाकडून डॉक्टरांना कोणतीही आगावू माहिती देत नाही, परंतु चौकशी करून करवाई करू*
*शशिकांत यादव – सहाय्यक आयुक्त FDA. रत्नागिरी*








