- गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळाच्या निवेदनाची तातडीने दखल; सरपंच, ग्रामसेविका, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे मानले आभार
गोविळ / प्रतिनिधी : गोविळ गावातील जमिनी परप्रांतीयांना विक्री करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळ (मुंबई) यांच्यावतीने ९ मे २०२६ रोजी ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेत २८ मे २०२६ रोजी विशेष सभा आयोजित केली.
या विशेष सभेत ठराव क्रमांक ८ सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गावाच्या जमिनी व भविष्यातील हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने म्हटले आहे.
या निर्णयाबद्दल मंडळाच्या वतीने सरपंच संतोष गुरव, ग्रामसेविका, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन करण्यात आले आहे.
दरम्यान, या महत्त्वपूर्ण विषयाची दखल घेत बातमी प्रसारित करणाऱ्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींचेही मंडळाने आभार व्यक्त केले आहेत.
गावाच्या हितासाठी आणि भविष्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळ (मुंबई) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
– गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळ (मुंबई)









