अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय…… नवरात्र उत्सवात च मिळणारं खुशखबर
Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
गणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Workers) आनंदाची बातमी समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात साधारण 50 टक्के वाढ आम्ही केली आहे,
येत्या दसरा दिवाळी ला अंगणवाडी सेविकांना आंनदाची जाणार हे नक्की.. गेले अनेक वर्ष हा विषय पेंडिंग होता मात्र आज झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत यावर पूर्ण सकारात्मक चर्चा होऊन निर्णय झाला.

Author: Prachi Sutar
Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.