SWSM मधील कक्ष अधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या पत्राला रत्नागिरी जिल्हा परिषद मधून केराची टोपली..

SWSM मधील कक्ष अधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या पत्राला रत्नागिरी जिल्हा परिषद मधून केराची टोपली….

रत्नागिरी  -( श्री निलेश रहाटे)….

रत्नागिरी मधील वाटद मिरवणे ग्रामपंचायत मधील स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सौचालय चा झालेला भ्रष्टाचार हयांचा संबंधित अधिकारी कडे २७ महिने संविधान पद्धतीने व नियमानुसार पाठपुरावा चालू आहे. २६-२-२४ च्या अर्धनग्न उपोषण नंतर रत्नागिरी चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री किर्ती किरण पुजार साहेब हयांच्या दालनामध्ये दि २८-०२-२४ ला ग्रामस्थ व तक्रारदार निलेश रहाटे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्य प्रचार प्रमुख व शाशन बातम्या प्रतिनिधी हयांच्या शी चर्चा करून घोटाळा कसा करण्यात आला व शाशन परिपत्रक नुसार कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला व पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी हयांना बनवलेली खोटी बिल, खाडाखोड बिल, सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक हयांचा पत्नी च्या नावानी १/२ लाभ घेतले गेले आहेत हे सर्व हयाआधी व त्या दिवशी ही पुरावे देण्यात आले होते. पण इथे सामान्य जनतेचे चालत नाही पण भ्रष्टाचार करणाऱ्या चे विचार चालतात असा अनुभव प्रत्यक्ष आला. RTI मधून जुलै २०२४ ला त्या तक्रार ची माहिती मिळाली व त्यात चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व पुरावे बगुन सुद्धा सांगत आहेत की शासन शुद्धीपत्रक २०१९ च्या परिपत्रकानुसार त्याच्या वर गुन्हा नोंद करू शकत नाही…. पण मूळ शासकीय दस्तऐवज मध्ये फेरफार करणे, खोट्या कागदपत्राचा समावेश केल्या असल्यास, अपहार, असे आढळल्यास जबाबदार संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा क्रमप्राप्त आहे व अश्या दोषी अधिकारी, कर्मचारी, हयांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा असे शासकीय परिपत्रक सुद्धा सांगत आहे व तसे पुरावे ही ग्रामस्थ व तक्रारदार नी सादर करून सुद्धा आजपर्यँत संबंधित अधिकारी हयांच्या बरोबर आता मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसते. तसेच राज्य पाणी व स्वच्छता मिशन सीबीडी बेलापूर नवी मुंबई मधील कक्ष अधिकारी वि. अ.जायकर दि :- १८ जानेवारी २०२४ ला प्रस्तुत तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कारवाईची माहिती तक्रारदार तसेच शासनाकडे सादर करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिले होते. परंतु दि:- ३०-०९-२४ ला RTI मधून मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार चा अहवाल आमच्या कडे सादर केलेला नाही व हया आधी सुद्धा एप्रिल २०२४ ला सेम उत्तर विभागीय आयुक्त कोकण विभाग नवी मुंबई यांच्याकडून मिळाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी हयांच्या कडून जर एवढा हलगर्जीपणा होत असेल तर बाकीच्या कार्यालय मध्ये काय अवस्था असू शकते ? आता जिल्हा परिषद रत्नागिरी मधील सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा हया भ्रष्टाचार वर वेल काढू पणा दिसत आहे व भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकारी हयांच्या डोक्यावर हात ठेवला आहे असे दिसत आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें