दादर नायगाव येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

दादर नायगाव येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा..

तळवली-(मंगेश जाधव)..

बौद्धजन पंचायत समिती शा. क्र. ५७९ अंतर्गत संघमित्रा महिला मंडळ यांच्या वतीने अशोका विजया दशमी तथा ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शनिवार दि. १२/१०/२०२४ रोजी ज्योतिबा रहिवाशी संघ, महात्मा ज्योतिबा फुले रोड, नायगाव, दादर (पु) मुंबई – १४ येथे शाखा अध्यक्ष आयु. राहुल गजानन अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

सकाळी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी बौद्धजन पंचायत समिती गट क्र. १४ चे गट प्रतिनिधी आद. संदेश खैरे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सचिव, बौ.पं. स. शा. क्र. ११३ चे उपाध्यक्ष आयु. दिपक मोरे, बौ.पं.स.शा.क्र.१११ चे सचिव आयु. सुशील जाधव, बौ.पं.स. शा. क्र. ८१६ चे अध्यक्ष आयु. राजेंद्र जाधव, बौ.पं.स.शा‌‌.क्र. १०२ चे खजिनदार आयु. साकेन जाधव आदी उपस्थित होते.

सायंकाळी आयुनी संगीता तांबे यांनी बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण केले.आयुनी अविका तांबे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीला पुष्प हार अर्पण केला. संघमित्रा महिला मंडळ अध्यक्षा आयुनी दामिनी तांबे यांनी दिप प्रज्वलीत करून संघमित्रा महिला मंडळ च्या माजी उपसचिव आयुनी प्रविणा साळवी यांनी अगरबत्ती प्रज्वलीत करुन बुद्ध वंदना घेऊन भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना मुक-श्रद्धाजंली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाला प्रियांका शिंदे, रेखा कांबळे, प्रविणा साळवी, ज्योती तांबे, अविका तांबे, कु. संस्कृती साळवी, कु. कनिष्का अहिरे, कु. कनिष्क अहिरे यांनी गीत गायले तर कु. तनिष्क साळवी यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व समजून सांगितले. समारोप करताना अध्यक्षिय भाषण करताना सम्राट अशोक यांचा विजया दशमी दिन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा सचिव आयु. सुदिप अहिरे यांनी केले.

कार्यक्रमासाठी आयु. अरूण वाघमारे यांनी सकाळी लाडू वाटप केले तर विभागातील समाजसेवक आयु. आशिष (बंटी) बाफना यांनी सायंकाळी अल्पोपहार वाटप केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल अहिरे, निलेश साळवी, रोहित तांबे, सुदिप अहिरे, जयवंत तांबे, दिपक तांबे, दामिनी तांबे आणि सहकारी यांनी मेहनत घेतली.

plz Join whatsup group ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें