ना. मा. उदय सामंत आणि ना.रविंद्र चव्हाण यांची रत्नागिरी नगर वाचनालयाला भेट..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ना. मा. उदय सामंत आणि ना.रविंद्र चव्हाण यांची रत्नागिरी नगर वाचनालयाला भेट

Ratnagiri vartahar

.

महाराष्ट्रातल्या वाचनचळवळीत सर्वोत्कृष्ट काम करणारे 196 वर्षाचे सर्वात जूने पण अद्यायावत वाचनालय माझ्या रत्नागिरी विधानसभेतील ही अभिमानाची गोष्ट – ना. उदय सामंत

 रत्नागिरी (वार्ताहर) -आज महाराष्ट्र शासनातील दोन जेष्ठ मंत्री मा. ना. रवींद्र चव्हाण व मा. ना. उदयजी सामंत यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला एकत्र आवर्जून भेट दिली. त्याप्रसंगी वाचनालयात उपस्थित असणा-या वाचक बंधू भगिनींना समोर आपले शुभेच्छापर विचार मंत्रीद्वयीनी ठेवले.
स्वा. सावरकरांसारख्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभलेले हे वाचनालय. या वाचनालयाने ठेवलेली उत्तम व्यवस्था आणि वाचनालयाची प्रदीर्घ वाटचाल, येथील 1 लाख 14 हजार पुस्तकांचे समृध्द ग्रंथभांडार हे सुसंस्कृत रत्नागिरीची ओळख आहे. असे सांगत वाचनालयाच्या पुनर्बांधकामासाठी आपले संपूर्ण सहकार्य राहील असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मा. ना. उदय सामंत यांनी मुक्त कंठाने अॅड. दीपक पटवर्धन यांचे रचनात्मक कामाची प्रशंसा करत हे वाचनालय त्यांनी उत्तम पद्धतीने विकसित केले आहे. या वाचनालयाला 30 वर्ष मुदतीने जागा उपलब्ध व्हावी म्हणून मला माझ्या पदाचा वापर करुन योगदान देता आले हे माझे भाग्य आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता प्राप्त झाला त्यामुळे आता वाचनालयांचे महत्व वाढणार आहे. अशा कालखंडात माझ्या रत्नागिरी मतदार संघातील हे ग्रंथसंपदा आणि दर्जेदार वाचक यांची मांदयाळी असल्याने या वाचनालयाला अधिक प्रभावी काम करता येईल, ग्रंथसंपदेने समृध्द असणारे हे वाचनालय उत्कृष्ट काम करत आहे, हे वाचनालय माझ्या मतदार संघात आहे ही बाब माझ्यासाठी व रत्नागिरीकरांसाठी अभिमानाची आहे. असे सांगत ह्या वाचनालयाच्या भविष्यातील सर्व उपक्रांसाठी शुभेच्छा देत अॅड. पटवर्धन यांचे पाठीशी ठामपणे उभे राहू असे ना. उदय सामंत म्हणाले.

या प्रसंगी मंत्रीद्वयींचा शाल श्रीफळ पुष्प करंडक देऊन वाचनालयाचे वतीने अॅड. दीपक पटवर्धन यांनी सत्कार केला. या प्रसंगी श्री. बबनराव पटवर्धन, संतोष पावरी, श्रीराम भावे, केदार करंबेळकर, शिरिष दामले यांचेसह मोठा वाचकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार