लोकायत प्रकाशन संयोजितमीत फाउंडेशन (रजि.) तर्फे दिवाळी निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन….
तळवली (मंगेश जाधव).
लोकायत प्रकाशन संयोजित मीत फाउंडेशन (रजि.) तर्फे दिवाळी निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धोचे आयोजन करण्यात आले आले असून ‘प्रदूषण विरहित दिवाळी ‘ आणि ‘आठवणीतील दिवाळी’ या दोन्ही विषयांवर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी चित्र आणि निबंध पाठवताना नाव, पत्ता, वय, शिक्षण, संपर्क क्रमांक, ईमेल अशी स्वतःची माहिती देणे बंधनकारक असेल अन्यथा चित्र व निबंध ग्राह्य धरले जाणार नाही. ३१ ऑक्टोबर २०२४ ही या स्पर्धेची शेवटी तारीख असून ९९६९३७४९३७ या क्रमांकावर स्पर्धकांचे चित्र व निबंधा सोबत स्वतःची माहीती पााठवावी.
या स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे असून, त्यात वयाची अट नाही, फक्त स्पर्धक विद्यार्थी असणे आवश्यक आहे. स्पर्धा फक्त मुुंबई , मुंबई उपनगर, ठाणे, व पालघर जिल्ह्या करीता मर्यादीत असेल. स्पर्धकांनी काढलेले चित्र पुढील दिलेल्या व्हाटसअप क्रमांकावर पीडीएफ व जेपीजी स्वरूपात पाठवावे. स्पर्धकांनी चित्र स्वतः काढलेले असावे सोबत चित्र काढतानाचा सेल्फी सुध्दा व्हॉट्सअप क्रमांक पाठवणे बंधनकारक आहे. निबंधाची शब्द मर्यादा १००० शब्द असेल. चित्र काढताना A३, A४ कागदाचा वापर करावा. स्पर्धेदरम्यान वेळोवेळी करण्यात आलेला बदल आणि हक्क हे फाउंडेशनच्या समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे प्रमाणपत्र, पुस्तक व व रोख रक्कम देण्यात येणार असून उतेजनार्थ विजेत्या स्पर्धकाला प्रमाणपत्र व पुस्तक अशी पारितोषिके देण्यात येतील. निकालाची तारीख व पारिताषिक वितरण हे स्पर्धेनंतर सर्व स्पर्धकांना व्हाटसअपद्वारे कळविण्यात येईल. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत रजिस्टे्रशन उपलब्ध असेल. रजिस्ट्रेशन करीता वरील QR कोड सॅन करावा आणि महिती भरावी.















