गुहागर विधानसभेत राजेश बेंडलांचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा.निलेश सुर्वे, अध्यक्ष-भारतीय जनता पार्टी, गुहागर.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर विधानसभेत राजेश बेंडलांचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा. मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम..

निलेश सुर्वे, अध्यक्ष-भारतीय जनता पार्टी, तालुका गुहागर.

तळवली प्रतिनीधी-
गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार सन्मा.राजेशजी बेंडल यांचा अवघ्या 2821 मतानी झालेला पराभव हा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजेशजीना एवढी प्रचंड मतं मिळवून देताना जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला सलाम असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यांनी विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होतानाच या विधानसभा मतदारसंघात मला विरोधकच नाही, माझ्यासमोर कोण उभच राहू शकत नाही, जर उभा राहिला तर त्याला असा लोळवतो की तो पुन्हा उभाच राहणार नाही आणि कोणी जरी लढला तरी माझे मताधिक्य हे 50,000 च्या वरचे असेल अश्या वल्गना केल्या होत्या. मात्र या विधानसभेत भाजपाचे पालक रविंद्रजी चव्हाण साहेब, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, माजी आमदार डॉ.विनयजी नातू, आमदार रविंद्रजी फाटक, जिल्हाध्यक्ष केदारजी साठे साहेब,नगरसेवक राजेश मोरे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, कुणबी सेना,बळीराज सेना आणि सर्व घटक पक्षांच्या मदतीने सन्मा.राजेशजी बेंडल यांच्या नेतृत्वात महायुतीने अशी काही मोट बांधली की विद्यमान आमदारांना विजयासाठी घाम फोडला आणि यातच विद्यमान आमदारांना आपण 17 वर्ष नेतृत्व करत असताना कोणत्या स्तराला आहोत याची जाणीव करून दिली. या गुहागर विधानसभेत मी आणि मीच आहे माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही अशी ज्यांची भावना होती त्यांना या विधानसभेतील मतदारांनी जागेवर आणले. मग मोदीजींच्या योजना असतील किंवा महाराष्ट्र राज्याच्या शिंदे साहेब, फडवणीस साहेब, अजितदादांच्या जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या योजना असतील यांची टिंगल टवाळी करतानाच या योजना कशा चुकीचे आहेत हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या लाडक्या बहिणी असतील किंवा योजनांचे अनेक लाभार्थी असतील यांनी सडेतोड उत्तर मतयंत्रातूनच दिले आहे. नशिबाने थोडीशी हुलकावणी दिल्यामुळे राजेश बेंडल यांचा पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार आले असल्यामुळे गुहागर तालुक्यातील नव्हे तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बिनधास्त राहावे. सर्वांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, विकास कामांच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने, कौशल्य विकासाच्या दृष्टीने महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही कायमच चार पावले पुढे राहील. असे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे.

⭕  गुहागर विधानसभा – आ. भास्कर शेठ जाधव यांचा निसटता विजय ????????https://ratnagirivartahar.in/archives/4508

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार