नेहरू युवा केंद्र रत्नागिरी च्या वतीने गुहागर येथे संविधान रॅलीचे आयोजन
गुहागर -(वार्ताहर)- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचे मार्फत गुहागर एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते गुहागर एसटी स्टँड ते श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय या दरम्यान संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले . प्रारंभी कॉलेज परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले .सदर कार्यक्रम प्रसंगी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सचिव संदीप भोसले, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील, मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर ,उपमुख्याध्यापक कोरके सर ,बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष वैभव गमरे, सामाजिक कार्यकर्ते बाबा देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते भीमसेन सावंत, दिलीप सावंत, संजयराव कदम ,प्रवीण साठले ,सांस्कृतिक कलावंत ठोंबरे ,माजी नगरसेविका निधी सुर्वे ,सर्व शिक्षक वृंद कॉलेजमधील 250 विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते वैभवजी गमरे यांचे सुभाष ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर प्राध्यापिका मनाली बावधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले .सुधाकर कांबळे यांनी प्रास्ताविक केले.मनोज पाटील यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन केले.ते म्हणाले की भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे .26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना म्हणून हे संविधान स्वीकारलेले आहे.म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, तसंच भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.वैभवजी गमरे यांनी सविनाबाबत मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्वल यश संपादन करावे म्हणून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मुख्याध्यापक सुधाकर कांबळे व कोरके सर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .त्यानंतर अत्यंत उत्साह पूर्ण व दिमाखदार वातावरणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मार्गे श्री देव गोपाळ कृष्ण हायस्कूल पर्यंत काढण्यात आली .त्यावेळी कॉलेज परिसरामध्ये सदर रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मनाली बावधनकर व मधुकर गंगावणे सर यांनी केले.