पनवेलमध्ये पकड मजबूत करण्यासाठी भाजपला “ठाकूर” शाही शिवाय पर्याय नाही

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पनवेलमध्ये पकड मजबूत करण्यासाठी
भाजपला “ठाकूर” शाही शिवाय पर्याय नाही

तळवली (मंगेश जाधव)..

पनवेल – पनवेल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर हे समिकरण वर्षानुवर्षे घटटच राहिले आहे. एकूणच पक्ष कोणताही असो पनवेलचे राजकारण लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठाकूण घराण्याभोवतीच फिरते. आधी काँग्रेस, शेकाप आणि आता भाजप तिन्ही पक्षात त्यांनी पक्षांतर केले. काळाची पावले ओळखत आणि दुरदृढी टाकत या ठाकूर पितापूत्रांनी आपले राजकीय अस्तित्व अबाधित राखले. आता प्रशांत ठाकूर यांना सलग चौथ्यांदा मिळालेला विजय भाजपच्या वाढत्या प्रभावाची चाहूल असली तरी पनवेलमध्ये राजकीय दृष्टया आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपला या ठाकूर पितापुत्रांशिवाय पर्याय नाही हेच सिध्द करते.
प्रशांत ठाकूर यांच्या घरातच राजकारण आहे. वडील रामशेठ ठाकूर माजी खासदार असून राज्यातील मातब्बर नेते आहेत. प्रशांत यांनी सिव्हिल इंजिनीयरिंगच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलं आहे. वाचन, पर्यटन आणि संगीत या त्यांच्या आवडत्या गोष्टी आहेत.
तत्कालीन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकापला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पनवेल नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणली. त्यामुळे शेकापला मोठं आव्हान मिळालं. काँग्रेसमधून त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर पहिल्यांदा
2009मध्ये विजयी झाले. शेकापचे बळीराम पाटील यांचा पराभव करत प्रशांत ठाकूर विजयी झाले आणि त्यांचा राजकारणात उदय झाला. त्यामुळे काँग्रेसचा पहिल्यांदाच विधानसभेत झेंडा फडकला होता.

त्यानंतर 2014 मध्ये भाजपची राज्यात सत्ता येणार असल्याची चाहूल लागताच पिता-पुत्रांनी खारघर टोलनाक्याचा प्रश्न उपस्थित करून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत ठाकूर यांनी 2014 मध्ये भाजपमधून निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मात्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. 2019 मध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, भाजप ऐवजी महाविकास आघाडीचं सरकार आल्याने सर्व गणितं बदलली. त्यामुळे ठाकूर यांचं मंत्रिपदाचं स्वप्नही भंगलं. मात्र, 2014 मध्ये भाजपने त्यांना सिडकोचं अध्यक्षपद देऊन पक्षाचीही ताकद वाढवली होती.पनवेलमध्ये शेकाप आणि शिवसेनेला रोखण्यात ठाकूर पिता-पुत्रांनी यश मिळविलेलं आहे. कोरोना काळात त्यांनी पनवेलकरांना मोठी मदत केली. पाच महिने ते नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात होते. गरजू, झोपडीट्टीधारकांना त्यांनी विशेष मदत केली. पनवेलमध्ये मोदी किचनच्या माध्यमातून त्यांनी दोन महिने गरजूंना अन्न वाटप केलं. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे यश प्रशांत ठाकूर यांनाच जाते. पनवेलमधून सलग चारवेळा निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. पहिली निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवून ते आमदार झाले. त्यानंतर भाजपमध्ये येऊन त्यांनी तीन विधानसभा निवडणुका लढवल्या आणि तिन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळविलं.

हे हि बातमी वाचा ..

https://ratnagirivartahar.in/archives/4619

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound