मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्या, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला संपर्क
मुंबई:— शिवसेना आणि भाजप युतीत पाच वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडला. मुख्यमंत्रिपदामुळे दोन पक्षांची युती तुटली. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तशाच घडामोडी सुरु आहेत. भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) मुख्यमंत्रिपदावरुन सुंदोपसुंदी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपनं मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीला संपर्क करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्या, अशी विनंती शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीला करण्यात आलेली आहे. मात्र राष्ट्रवादीनं अद्याप तरी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे समजते आहे.
मुख्यमंत्रिपद भाजप कडे च –
भाजपचा मुख्यमंत्रिपद झाल्यास व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा गेल्यास त्याला आमचा आक्षेप किंवा विरोध असण्याचं काहीच कारण नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कालच मांडली आहे.
राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन राष्ट्रवादीला करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिल्यास चित्र बदलू शकेल, असा विश्वास सेनेतील वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद साधत जुळवाजुळव सुरु केली आहे. शिवसेनेनं पाठिंबा मागितलेला असला, तरीही राष्ट्रवादीनं अद्याप तरी याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही.
???? मुख्यमंत्री भाजप चाचं होणारं, एकनाथ शिंदे यांनी केली मोठीं घोषणा .????????https://ratnagirivartahar.in/archives/4641