गोरेगाव पश्चिम येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

गोरेगाव पश्चिम येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

तळवली(मंगेश जाधव)

बौध्दजन पंयाचत समिती अंतर्गत सर्व शाखा तसेच गोरेगांव गट क्र .२७ समन्वय समिती यांच्या विद्यमाने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेल्या संविधान दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा उत्सव नुकताच चंद्रमणी बुध्द विहार, तीन डोंगरी, जिजामाता नगर , गोरेगाव पश्चिम येथे विभागाचे गट प्रतिनिधी राजेश घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करीत असताना समन्वय समितीचे सरचिटणीस शिवाजी मोहिते यांनी उत्कृष्ट सूत्र संचालन करून

सदर कार्यक्रमाची सुरूवात बुध्द वंदना घेवून तसेच सामुदायिक उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांचे स्वागत समारंभ घेण्यात आला. यावेळी संविधान प्रचारक ॲड. संतोष सांजकर यांचे ‘संविधानाचे महत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून बौध्दजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत उपस्थित होते.

यावेळी गटा अंतर्गत सर्व शाखेच्या पदाधिकार्यांनी,महिला मंडळांनी तसेच उपासक -उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाला ख्रिश्चन, मुस्लिम बांधव आणि विविध जातीधर्माच्या नागरिक देखील उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन आणि अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें