लोक कलेतील तपस्वी हरपला! दिवंगत शाहीर मधूकर नेराळे यांना लोक कलावंत आणि मान्यवरांची श्रद्धांजली.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लोक कलेतील तपस्वी हरपला! दिवंगत शाहीर मधूकर नेराळे यांना लोक कलावंत आणि मान्यवरांची श्रद्धांजली.

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शाहीर मधुकर नेराळे कायम कलावंतांच्या भल्यासाठी झगडत राहिले‌, त्यांच्या जाण्याने खर्‍या अर्थाने लोककला पोरकी झाली, अशा शब्दात नाटककार, पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी श्रद्धांजली वाहिली तर नेराळे यांच्या निधनाने लोककलेचा आधारवड हरपला, अशा भावना मुंबई विद्यापीठाच्या लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्रातील तमाशा लोककलेचे प्रेरणास्थान आणि कलावंताचे आधारवड शाहीर मधुकर नेराळे‌ यांचे गेल्याच आठवड्यात ह्रदय विकारामुळे लालबाग चिवडा गल्लीतील न्यू हनुमान थिएटरच्या कार्यालयात वयाच्या ८१ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. तमाशा लोककलेचे तपस्वी ठरलेल्या मधुकर नेराळे यांच्या निधनाने कला विश्वात दुःखाचे वातावरण आहे. लालबाग येथील लोककलावंतांचे आधारवड ठरलेले‌ न्यू हनुमान‌ थिएटर एकाएकी पोरके झाले. त्याच ठिकाणी बुधवारी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, शाहिरी लोक कला मंच, ऑर्केस्ट्रा असोसिएशन, तिळवण तेली समाज आणि सर्वश्री नेराळे कुटुंबियांच्या वतीने शोकसभा पार पडली.

शाहीर मधुकर नेराळे‌ कधी कलावंतात कला रुजविण्यात दंग झाले, तर कधी नवी‌ संघटना उभी करण्यात मग्न राहिले, तर कधी निराश्रित कलावंताला सरकारी अनुदान मिळवून देण्यात व्यस्त राहिले‌‌. महाराष्ट्राच्या मातीची ओळख असलेल्या तमाशा लोककलेला तर मरणासन्न अवस्था निर्माण झालेली. तिला राज्याच्या कानाकोपर्‍यात दौरे काढून मधुकर नेराळे‌ यांनी ऊर्जितावस्था निर्माण करून दिली. लालबाग येथील हनुमान थिएटर‌ तर अनेक निराश्रीत कलावंताना आश्रयस्थान राहिले आहे, या सर्व आठवणींना कालच्या श्रद्धांजलीच्या सभेत अनेक मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणाद्वारे उजाळा दिला. सभेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नगरसेवक अनिल कोकीळ, शिवाजी मंदीरचे संचालक रामिम संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, पत्रकार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शाहीर कुमार वैराळकर, शाहीर देवानंद माळी, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, तमाशा कलावंत रेश्मा परितेक, राजश्री नगरकर आदी कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. संघराज रुपवते, शाहिरी लोक कला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण आणि मंचचे समन्वयक लेखक काशिनाथ माटल, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार राजेंद्र सकसकर, दिलिप खोंड आदींनी उपस्थित राहून मधूकर नेराळे यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाहीरी लोककला मंचचे सरचिटणीस आणि प्रसिद्ध शाहीर मधु खामकर यांनी आयोजनात भाग घेऊन सभेचे सूत्रसंचालन केले. सर्वश्री मुन्ना, राजेश राजेंद्र मधूकर नेराळे यांचा श्रद्धांजली सभेत विशेष सहभाग राहिला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध

SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई

🟣 SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई रत्नागिरी - रत्नागिरी...
Read More
SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई

वाटदच्या सुपुत्राला राज्यस्तरीय सन्मान : संदीप जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर

वाटदच्या सुपुत्राला राज्यस्तरीय सन्मान : संदीप जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर   रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे  ...
Read More
वाटदच्या सुपुत्राला राज्यस्तरीय सन्मान : संदीप जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर

मुंबईत बांगलादेशी घुसखोर कसे येतात? — आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

मुंबईत बांगलादेशी घुसखोर कसे येतात? — आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल   मुंबई | प्रतिनिधी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कथित...
Read More
मुंबईत बांगलादेशी घुसखोर कसे येतात? — आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं.१ येथे दि.१४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं.१ येथे दि.१४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आबलोली (संदेश कदम) गुहागर...
Read More
जि.प.आदर्श शाळा खोडदे नं.१ येथे दि.१४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

टकर–डेलानीचा धडाका, आयर्लंडचा ओमानवर ९६ धावांनी दणदणीत विजय; टी–२० विश्वचषकात विक्रमांची बरसात

टकर–डेलानीचा धडाका, आयर्लंडचा ओमानवर ९६ धावांनी दणदणीत विजय; टी–२० विश्वचषकात विक्रमांची बरसात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
टकर–डेलानीचा धडाका, आयर्लंडचा ओमानवर ९६ धावांनी दणदणीत विजय; टी–२० विश्वचषकात विक्रमांची बरसात

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड आबलोली (प्रतिनिधी) गुहागर तालुका सरपंच संघटनेची बैठक...
Read More
गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा   रत्नागिरी, ता. १३ : राज्य सरकारने जमीन महसूल...
Read More
जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर शहरी मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने; ११६ नगरपालिका आणि ७ महानगरपालिकांमध्ये...
Read More
तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय
Play sound