जिल्ह्यात 20 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात 20 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 6 डिसेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 20 डिसेंबर 2024 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. 66 चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.

शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील...
Read More

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना हाताला काम देणारी महात्मा गांधी...
Read More
नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

🔴 लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी : ७६ दिवसांपासून सुरू धरणे आंदोलन;...
Read More
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

*खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार   राजगुरुनगर (गुरुदत्त वाकदेकर): येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा...
Read More
खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६...
Read More
गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार गुहागर - गेले पंचवीस तीस वर्ष भजनी कलावंत म्हणून काम...
Read More
नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

💠 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना! ### ✅ राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ नोव्हेंबर २००५...
Read More
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान

तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान “अधिकारी खिशात आहेत” म्हणत धमक्या; गंभीर आरोपांनंतरही ठोस कारवाई नाही, पालक संतप्त...
Read More
तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान