१२ रोजी “वंचित” च्या मोर्चात गुहागर तालुक्यातील धम्म संघटनांचा ‘किचींत”हि सहभाग नाही

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

१२ रोजी “वंचित” च्या मोर्चात गुहागर तालुक्यातील धम्म संघटनांचा ‘किचींत”हि सहभाग नाही

 

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनांचा मोर्चात सहभागी न होण्याचा निर्धार

आबलोली (संदेश कदम)

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाच्या वतीने दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी गुढे फाटा ते प्रांत कार्यालय चिपळूण असा मोर्चा काढण्यात येणार असून या “वंचित” च्या मोर्चात गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटना “किंचित” हि सहभाग घेणार नाहीत असा स्पष्ट खुलासा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनांच्या पदाधिकारी यांनी आबलोली येथील पत्रकारांशी बोलताना केला आहे

यावेळी बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर शाखा आबलोली या धम्म संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम कदम (गुरुजी) हे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा आंम्ही जाहीर निषेध करतो आहोत परंतू या हल्ल्याची बातमी आंम्हाला समजताच समाजबांधव म्हणून आंम्ही ताबडतोब गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची संपूर्ण माहिती घेऊन गुहागर तालुक्यातील सामाजिक धार्मिक संघटना आता या क्षणापासून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अण्णा जाधव आपले याबाबतीत भूमिका काय? यावेळी अण्णा जाधव यांनी यावेळी मी बरा आहे. मी सर्वांना विनंती करतो आपण शांत रहा माझ्यावर योग्य पध्दतीने उपचार चालू आहेत माझा आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनावर पुर्ण विश्वास आहे तरी सर्वांनी शांत रहा असे विनंती पुर्वक सांगितल्याने सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते,आप – आपल्या घरी निघून गेले

परंतू लगेच दुसऱ्या दिवशी गुहागर तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे येथे गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका गुहागर या धम्म संघटनांची सुरेश (दादा) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन हि गुहागर तहसीलदार,पोलिस ठाणे गुहागर आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला वरिल तिंन्ही संघटनांचे वतीने देण्यात आले. या तिंन्ही संघटनांचे वतीने गुहागर तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्याचे निश्चित झाले असताना अण्णा जाधव हे या प्रकरणात धम्म संघटनांतर्फे मोर्चा न काढता स्वतः चा राजकीय पक्ष पुढे आणून वंचित बहुजन आघाडी या पक्षा तर्फे दि. १२ रोजी मोर्चाचे आयोजन करुन दिशा भूल करतात त्यामुळे आमचे स्पष्ट मत आहे की, आंम्ही या आंदोलनात गुहागर येथे गुहागर तालुक्यातील सामाजिक,धम्म संघटना म्हणून अग्रेसर झालो असतो पण वंचित च्या या आंदोलनात आंम्ही गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या संघटना किंचित हि सहभागी होणार नाहीत असा स्पष्ट खुलासा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर शाखा आबलोली या संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...