ए.जी. हायस्कूलच्या पर्यवेक्षिका श्रीम. गीता पांगारकर सेवानिवृत्त

ए.जी. हायस्कूलच्या पर्यवेक्षिका श्रीम. गीता पांगारकर सेवानिवृत्त

 

दापोली : शहरातील दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. हायस्कूलच्या पर्यवेक्षिका गीता पांगारकर या नुकत्याच वयोनियत मानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांना शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदिच्छा देण्यात आल्या.

 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व गणेश पूजनाने करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एस. एम. कांबळे, शिक्षक मगदूम एस.आय., शैलेश आठल्ये, पाजपंढरी विद्यालयाचे मुख्याध्यापक पांढरे सी.एन., जाधव डी.आर., आर्या दाबके यांनी सत्कारमूर्ती गीता पांगारकर यांच्या सेवा कालावधीमध्ये आलेले अनुभव आपल्या मनोगतामधून कथन केले. तसेच पांगारकर यांचे चिरंजीव स्वप्निल पांगरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले की आईने केलेल्या संस्कारामुळेच जीवनामध्ये यशस्वी झालो. तसेच आई शाळेतून आल्यावर दिवसभरातील घडामोडी याविषयी आमची चर्चा व्हायची परंतु सेवानिवृत्तीनंतर या गोष्टीवरती आता आमची चर्चा होणार नाही याचीही चिरंजीव स्वप्निल यांनी खंत व्यक्त केली. यावेळी दापोली शिक्षण संस्थेच्या संचालिका स्मिता सुर्वे यांनी पांगाकर यांना शुभेच्छा देताना म्हणाल्या जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला ईश्वर मदत करत असतो आणि अशाच प्रकारचे काम पांगारकर यांनी आपल्या अखंड सेवेमध्ये केलेले आहे हे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सेवानिवृत्ती कालावधीनंतरसुद्धा संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन सुर्वे यांनी पांगारकर यांना केले.

 

सत्कारमूर्ती पांगारकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संस्थेने आणि कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्यामुळेच मला माझ्या जीवनामध्ये यशस्वी होता आले. याबद्दल संस्थेचे आजी-माजी संचालक मंडळ त्याचबरोबर शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक यांचे आभार मानले. शेवटी अध्यक्षीय मनोगतामध्ये रविंद्र कालेकर म्हणाले की, प्रत्येक शिक्षकामध्ये आपल्या विषयाची मास्टरकी असणं आणि ती मास्टरकी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांमध्ये उतरवणं ही एक कला आहे. आणि ही कला पांगारकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये उतरवली असून त्या अनेक विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आपल्या सहकार्यांबरोबर मैत्रीचं नातंसुद्धा आदर्शवत असल्याचेही सांगून त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

यावेळी शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर तसेच संचालिका स्मिता सुर्वे यांचे हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू व मानपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मानपत्राचे वाचन ओजस तेरेदेसाई यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ शिक्षक नितीन मुंडेकर, आडे विद्यालयाचे शिक्षकप्रमुख गाडे व्ही.जी., पर्यवेक्षिका मोहिनी खटावकर, विद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पांगारकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.वाय.कोकणे यांनी केले. सूत्रसंचालन गौरी करंदिकर यांनी केले तर आभार स्नेहल डोंगरे यांनी मानले.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें