ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन.

नागपूर -राज्याची उपराजधानी नागपूर मध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून नुकत्याच पार पडलेल्या एका विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला.त्यामुळे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याने आत्मविश्वास दुणावलेले सत्ताधारी विरुद्ध संख्येने कमी असलेले विरोधी बाकांवरील महाविकास आघाडी अधिवेशना च्या निमित्ताने समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे ऐन थंडीत राजकारण चांगलंच तापणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरत आंदोलन सुरु केले आहे. ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी विधानभवनात आंदोलन सुरु केले आहे. *ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा,* अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळा च्या पायऱ्यांवर आक्रमक होत प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची प्रतिकृती हातात घेऊन *ईव्हीएम सरकार विरोधात लोकशाही वाचवा,ईव्हीएम हटवा,ईव्हीएम हटवा,देश वाचवा* अशा जोरदार घोषणाबाजी केल्या.

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचं हे अधिवेशन आहे.16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन असणार आहे.त्यामुळे या पहिल्याच अधिवेशनात राज्या तील विदर्भासह जनतेला सरकार कडून मोठी अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना,शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव,रोजगार आणि इतर अनेक बाबींबर सरकारकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे.दरम्यान, या अधिवेशनात जवळपास 20 विधेयकं सादर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधकांसोबत चर्चेची तयारी असून त्यांच्या मुद्यांना उत्तरं देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विरोधकांच्या विषयां वर सभागृहात सविस्तर उत्तर देणार. आमची चर्चेची तयारी आहे.

विरोधी पक्षाने सभागृहात चर्चा करावी,आम्ही त्यांचा आवाज दाबणार नाही.लोकसभेप्रमाणे पळ काढून मीडियासमोर बोलण्याचं काम करू नका,असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.अवघे 47 आमदारांचे पाठबळ असलेल्या महाविकास आघाडीची 237 इतके संख्याबळ असलेल्या महायुतीसमोर आव्हान टिकवून ठेवण्याची कसोटी लागणार आहे.या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता असूनहिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. परभणीत उसळलेला हिंसाचार,आंबेडकरी अनुयायींवर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई,बीड जिल्ह्यात सरपंचाची झालेली हत्या, कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू या घटनांचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटण्या ची शक्यता आहे

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी